संविधान (१२६ वी दुरुस्ती) विधेयक, २०१९ लोकसभेत सादर

Date : Dec 10, 2019 04:17 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
संविधान (१२६ वी दुरुस्ती) विधेयक, २०१९ लोकसभेत सादर
संविधान (१२६ वी दुरुस्ती) विधेयक, २०१९ लोकसभेत सादर

संविधान (१२६ वी दुरुस्ती) विधेयक, २०१९ लोकसभेत सादर

  • ९ डिसेंबर, २०१९ रोजी संविधान (१२६ वी दुरुस्ती) विधेयक, २०१९ लोकसभेत सादर

वेचक मुद्दे

  • अनुसूचित जाती (Scheduled Caste - SC) आणि अनुसूचित जमातीं (Scheduled Tribes - ST) बाबत तरतूद

  • त्यांना दिलेल्या आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ देण्याचा विचार

वेचक मुद्दे

  • अँग्लो-इंडियन समुदाय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना दिल्या जाणाऱ्या आरक्षणाची मुदत २ जानेवारी, २०२० पर्यंत

  • आरक्षण आणखी १० वर्षे म्हणजे २५ जानेवारी, २०३० पर्यंत सुरू ठेवण्यासाठी विधेयक मांडणी

  • आरक्षणाचा कलम ३३४ मध्ये समावेश

कलम ३३४ बद्दल थोडक्यात

  • जागा आरक्षणाच्या तरतुदी आणि अँग्लो-इंडियन समुदाय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे विशेष प्रतिनिधित्व ४० वर्षानंतर संपुष्टात येईल

  • १९४९ मध्ये या कलमाचा समावेश

  • ४० वर्षांनंतर त्यामध्ये १० वर्षांच्या मुदतवाढीकरिता सुधारणा

घटना दुरुस्ती बद्दल थोडक्यात

  • घटनेत बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक माध्यम

  • कलम ३६८ नुसार २ प्रकारच्या घटनात्मक दुरुस्त्या समाविष्ट

    • विशेष बहुमताने लागू केलेली दुरुस्ती

    • विशेष बहुमताने लागू केलेली दुरुस्ती आणि किमान अर्ध्या राज्य विधानमंडळांची मंजुरी

  • मतदानास उपस्थित असलेल्या दोन तृतीयांश (२/३) सदस्यांची विशेष बहुमतासाठी मंजुरी आवश्यक

  • मतदानाच्या वेळी गृहाच्या एकूण सदस्यांपैकी ५०% पेक्षा जास्त उपस्थित असणे आवश्यक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.