केंद्रीय माहिती आयोगाचा वार्षिक अहवाल लोकसभेत सादर

Date : Nov 23, 2019 05:01 AM | Category : राजकीय आणि घटनात्मक
केंद्रीय माहिती आयोगाचा वार्षिक अहवाल लोकसभेत सादर
केंद्रीय माहिती आयोगाचा वार्षिक अहवाल लोकसभेत सादर

केंद्रीय माहिती आयोगाचा वार्षिक अहवाल लोकसभेत

 • केंद्रीय माहिती आयोगाचा २०१८-१९ साठीचा वार्षिक अहवाल २० नोव्हेंबर रोजी लोकसभेत सादर

 • तोच अहवाल २१ नोव्हेंबर रोजी राज्यसभा पटलावर

अहवालाची ठळक वैशिष्ट्ये

 • २०१८-१९ मध्ये आयोगाच्या केंद्रीय सार्वजनिक प्राधिकरणामार्फत सुमारे १.७० लाख अर्ज प्राप्त

 • २०१७-१८ च्या तुलनेत ही संख्या ११% जास्त

 • प्राप्त अर्जांपैकी केवळ ७.७ % अर्जांवर आयोगाकडून प्रक्रिया

 • आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून सर्वाधिक अर्ज नाकारणी (२६.५ %)

 • त्यापाठोपाठ गृह मंत्रालयाकडून १६.४१ % अर्ज नाकारणी

 • CIC कडून २०१८-१९ कालावधीत सुमारे १७,१८८ दुय्यम अपील आणि तक्रार प्रकरणे निकालात

केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission - CIC) बद्दल थोडक्यात 

स्थापना

 • २००५ मध्ये माहिती अधिकार कायद्यांतर्गत

आयोग रचना

 • १ मुख्य माहिती आयुक्त

 • १० माहिती आयुक्त

नेमणूक

 • मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नेमणूक भारतीय राष्ट्रपती समितीच्या शिफारशीनुसार

शिफारस समिती सदस्य

 • पंतप्रधान

 • विरोधी पक्षनेते

 • पंतप्रधानांकडून नेमलेले कॅबिनेट मंत्री

भूमिका

 • शासनाच्या यंत्रणेत पारदर्शकता राखणे

 • भ्रष्टाचार, शोषण आणि दुरुपयोग यांना आळा घालणे

आयोगाचे अधिकार आणि कार्ये

 • एखाद्या प्रकरणाला योग्य आधार असल्यास आयोगाकडून तपासाचे आदेश देणे शक्य

 • सार्वजनिक प्राधिकरणाद्वारा आपल्या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरक्षितता प्रदान करण्याचे अधिकार

 • सार्वजनिक प्राधिकरण कायद्याच्या तरतुदी पूर्ण करीत नसेल तर आयोगाकडून समानता स्थापन करण्यासाठी पावले उचलण्याची शिफारस

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.