केंद्राकडून ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वेतनात वाढ करण्याचा निर्णय

Date : Apr 02, 2020 10:50 AM | Category : योजना आणि प्रकल्प
केंद्राकडून ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वेतनात वाढ करण्याचा निर्णय
केंद्राकडून ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वेतनात वाढ करण्याचा निर्णय Img Src (Tax Return - Tax2win)

केंद्राकडून ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वेतनात वाढ करण्याचा निर्णय

  • ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केंद्राकडून वेतनात वाढ करण्याचा निर्णय

वेचक मुद्दे

  • कोविड-१९ च्या उद्रेकातून उद्भवलेल्या आर्थिक संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी नुकतेच पॅकेज जाहीर करण्यात आले आहे

ठळक बाबी

  • १.७ लाख कोटींच्या वित्तीय पॅकेजनुसार ग्रामीण भागातील कामगारांच्या पगारामध्ये सरासरी २० रुपये वाढ करण्यात आली आहे

  • लॉकडाऊन अटींचे उल्लंघन होणार नाही आणि सामाजिक अंतराच्या निकषांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची योग्य ती दक्षता घेण्यात आली आहे

  • सदर उद्देशासाठी राज्य व जिल्ह्यांना सखोल मार्गदर्शन व सल्ला देण्याचे निर्देश समितीमार्फत देण्यात आले आहेत

वेतन सुधारणा: घोषणा

  • ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ३१ मार्च रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वेतन सुधारित करण्यात आले

  • १ एप्रिलपासून सदर संकल्पाचा अंमल सुरू होईल

लक्ष केंद्रित विभाग

  • अनुसूचित जमाती

  • महिला नेतृत्त्वात असलेली घरे

  • लघु व सीमांत शेतकरी

  • अनुसूचित जाती

  • इतर गरीब कुटुंबे थेट लाभार्थी

पार्श्वभूमी

  • ग्रामीण विकास मंत्रालयाकडून यापूर्वी याकरिता कार्य करण्यात आले होते 

  • चालू आर्थिक वर्षातील उर्वरित जबाबदाऱ्या सोडविण्यासाठी विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना सुमारे ४४३० कोटी रुपये मंजूर केले आहेत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.