कोविड-१९ कृती संघ जो जागतिक स्तरावर सर्वप्रथम अशा स्वरूपाचा आहे त्याची भारतात सुरूवात झाली आहे
कोविड-१९ कृती संघ खासगी क्षेत्राच्या प्रमुख फंड व्यवस्थापक आणि ब्लू-चिप व्हेंचर कॅपिटल फर्ममार्फत सुरू झाला आहे
संघाकडून स्थापन केलेल्या निधीतून मायलॅबने १ कोटी रुपये मिळविल्यामुळे संघाची लोकप्रियता वाढीस लागली आहे
मायलॅब ही कोरोना तपासणी किट बनवून विकण्याची परवानगी मिळवणारी भारतातील पहिली कंपनी ठरली आहे
भारत सरकार सध्या स्वदेशात बनवलेल्या किटचा वापर आणि प्रचार करीत आहे
G-२० शिखर परिषदेत भारताकडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund - IMF) किट्सचा वापर करण्याच्या सूचनेस नकार देण्यात आला आहे
विषाणूच्या चाचणीसाठी स्वदेशात बनवलेल्या किटचा वापर करावा अशी भारताची भूमिका आहे
भारतीय नवउद्योजक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कोविड-१९ आधारित उत्पादने आणि संशोधन कार्यांवर काम करण्यासाठी संघाकडून हा निधी उभारला जात आहे
१०० कोटींची सोय करणे हे या संघाने उद्दिष्ट ठेवले आहे
सदर पुढाकार हा जगातील सर्वप्रथम प्रकारचा आहे
कार्यसंघ निधी संकलन करून कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी उत्पादने आणि सेवांवर काम करणार्या उपक्रमांची ओळख पटवून देईल
संघाने आतापर्यंत ४०% अनुदान जमा करण्यात यश मिळवले आहे
केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्र्यांनी देशातील स्टार्टअपशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान नुकतेच या संघाचे कौतुक केले आहे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.