STI Pre - 2013


1. 

तरूण सागर यांच्या बाबतच्या खालील विधानांचा विचार करा : 

अ. तरूण सागर हे बुद्ध मुनी आहेत.

ब. त्यांनी कडवे प्रवचन' नावाचे पुस्तक लिहिले.

क. हे पुस्तक जगात सर्वात मोठे असून त्याचे आकारमान 30 x 24' असून वजन 2000 किलोग्राम आहे.

ड. त्याची नोंद 'लिम्का बुक' मध्ये केली आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे ? 

2. 

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमुल्यन थांबवण्यासाठी स्वयंदुरूस्ती रचनात्मक उपाय असे : 

अ. संगणक आज्ञावली, यंत्रसामग्री आणि मोटारींची निर्यात वाढ.

ब. अनिवासी भारतीयांकडून डॉलर्सचा ओघ वाढविणे.

क. विनागरजेच्या वस्तूंची आयात कमी करणे.

वर दिलेल्या उपायांपैकी कोणता/कोणते उपाय बरोबर आहेत ?

3. 

'द गुड रोड' बाबतच्या खालील विधानांचा विचार करा : 

अ. हे चित्रपटाचे नाव आहे. 

ब. ग्यान कोरीया यांनी तो दिग्दर्शित केला आहे. 

क. चित्रपटाने या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून राष्ट्रीय अवॉर्ड मिळवला आहे. 

ड. हा दूसरा गुजराती चित्रपट आहे की ज्याचे पुढील वर्षाच्या ऑस्कर पारितोषिका साठी सर्वोत्तम परदेशीय चित्रपट विभागासाठी अधिकृत नामांकन केले जात आहे. 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

4. 

रघुराम राजन पॅनेलने प्रस्तावित केलेल्या घटकराज्यांच्या वर्गीकरणाप्रमाणे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही ?

5. 

जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला ? 

6. 

नकाराधिकार (राईट टू रिजेक्ट) म्हणजे :

अ. मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क.

ब. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सर्वांगीण बदल व सुधारणा होईल आणि राजकीय पक्षांना स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना उभे करणे भाग पडेल.

क. मतदानाचा कायदेशीर अधिकार आहे तर नकाराधिकार मूलभूत अधिकार आहे (सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार). 

ड. त्यामूळे निवडणूकीत शुद्धता, पारदर्शकता व जिवंतपणा वाढेल. 

वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे ? 

7. 

महाराष्ट्र शासनाची 'मनोधैर्य योजना विचारात घ्या.

अ. सदर योजना सर्व महिला व बालकांसाठी आहे.

ब. सदर योजना बलात्कार व अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी आहे.

क. किमान के 50,000 ते 2 लाख व कमाल 3 लाख रुपये अर्थसहाय्य. ड. या योजनेची अंमलबजावणी 15 ऑगस्ट 2012 पासून करण्यांत आली.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

8. 

भू-संपादन विधीनियम - 2013 बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. खाजगी प्रकल्पासाठी भू-संपादन 80% जमीन मालकांची संमती आवश्यक. 

ब. सार्वजनिक प्रकल्पासाठी भू-संपादन 70% जमीन मालकांची संमती आवश्यक. 

क. शहरीकरणासाठी भू-संपादन केल्यास 20% विकसित जमीन मूळ जमीन मालकास राखून ठेवणे विकासकावर बंधनकारक.

वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? 

9. 

कृत्रिम पाय असूनही माऊंट एवरेस्ट वर विजय प्राप्त करणारी जगाची पहिली महिला पर्वतारोही अरुणिमा सिन्हाला तिच्या या कार्यात कोणत्या संस्थेने सहकार्य केले ?

10. 

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जकाती ऐवजी स्थानिक संस्था कर [LBT) लागू होण्याची तारीख

11. 

जुलै 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे (खासदार-आमदार) सदस्यत्व निकाल लागलेल्या दिवशी रद्द करण्याबाबतचा निर्णय दिला. त्यानुसार _________ पेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींनी हा निर्णय लागू होणार आहे. 

12. 

खालील विधाने पहा :

अ. 11 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

ब. भारतात अधिकृत मान्यताप्राप्त भाषांची संख्या 22 आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

13. 

डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही ?

14. 

लांबदूरीची बैलेस्टिक मिसाइल पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करणारी टेक्नोलॉजी विकसित करण्यासाठी उल्लेखनीय योगदान करणारे वैज्ञानिक डॉ. वी.जी. शेखरन यांना कोणता पुरस्कार प्राप्त झाला आहे ?

15. 

जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्यूटर 'Tianhe-2' ही ___________ या देशाने बनविला आहे.

16. 

योग्य कथन/कथने ओळखा.

अ. डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3 चा उल्लेख ‘सर्वात टीकात्मक भाग' असा केला आहे.

ब. तामिलनाडू मध्ये एकूण आरक्षण कोटा 69% आहे.

 
 

17. 

तरूण तेजपाल इतक्यात बातक्यात होते. त्यांच्याबाबत खालील कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ? 

अ. तरूण तेजपाल हे तेहेलका या प्रत्येक महीन्याला निघणाच्या मासिकाचे मुख्य संपादक होते. 

ब. तेहेलकाची मालकी अनंत मिडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे. 

18. 

योग्य कथन/कथने ओळखा.

अ. पृथ्थकरणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो की, एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे.

ब. विकसनशील निर्वचनाचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक-विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो.

19. 

ग्रामसेवकाच्या संदर्भातील योग्य विधान निवडा.

अ. ते ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडतात.

ब. त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते. 

क. ते ग्रामपंचायतीची महत्वाची कागदपत्र व हिशेब सांभाळतात.

ड. ते पंचायत समितीच्या सभांच्या नोंदी ठेवतात. 

20. 

विधान (अ) : भारताच्या राज्यघटनेत ‘अल्पसंख्य' शब्दाची व्याख्या नाही.

कारण (ब): अल्पसंख्यांक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे.

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018