राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ - मराठी व इंग्रजी

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ - मराठी व इंग्रजी Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

क्रियाविशेषणांचे प्रकार व उदाहरणे यातील विसंगत जोडी ओळखा. 

42.

म्हणी आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. 

43.

जोड्या जुळवा.  

44.

पुढील विधाने वाचा व योग्य उत्तर लिहा. 

(a) अकारान्त, ईकारान्त व ऊकारान्त विशेषणांचे सामान्यरूप होत नाही. 

(b) ई-कारान्त नपुंसकलिंगी नामांचे सामान्यरूप आकारान्त होते. 

(c) अकारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप ई-कारान्त होते. 

पर्यायी उत्तरे : 

45.

पुढील विधाने वाचा.   

(a) द्, फ् ही महाप्राण व्यंजने आहेत. 

(b) स्, ख् ही अल्पप्राण व्यंजने आहेत.

(c) त्, थ् ही कठोर व्यंजने आहेत.

पर्यायी उत्तरे : 

खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 या प्रश्नांची उत्तरे द्या.

        'मी' हा हृदयघातको दिसतो! पण का?
        माणसाला इतरांपासून वेगळे पाडणा-या गोष्टी एकटेपण व ताण निर्माण करतात व त्यातून बरेचदा हृदयरोग निर्माण होतो. याउलट माणसा-माणसांत प्रेम व नातं निर्माण करणान्या गोष्टी, माणसाला निसर्गाशी, जगाशी जोडणाच्या गोष्टी माणसाच्या हृदयाला वाचवतात, माणसांचं माणसांशी तर सोडाच, पाळीव प्राणी व झाडांशी असलेलं भावनिक नातं देखील माणसाला हृदयरोगापासून संरक्षण देतं, असं वैज्ञानिक अध्ययनात आढळलं आहे.
               संबंध (relationship) माणसाला हवासा वाटतो, नव्हे ती त्याच्या जगण्याची मूलभूत गरज आहे असं एरिक फ्रॉम नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणतो, व्यक्तिकेंद्रित व स्पर्धेच्या आधुनिक (म्हणजे अमेरिकन) सभ्यतेत माणूस एकटा पडत जातो. गर्दीत असूनही एकटा, एकमेकांविरुद्ध स्पर्धक. घराबाहेर व्यावसायिक स्पर्धा, घरातही पती-पत्नीची एकाच भूमिकेसाठी, प्रभुत्वासाठी स्पर्धा. शेवटी अधिक यशासाठी स्वत:शी देखील स्पर्धा. या स्पर्धेचा सतत ताण. सर्वांशी तुटलेलं नातं. या संस्कृतीत जगण्यासाठी माणसाला 'मी' व 'माझं' यांचाच जप करावा लागतो. 'मी' हीच सर्वात मोठी विभूती होऊन तिचीच पूजा दिवस-रात्र चालते.
                 विकसित देशांपासून आम्ही उचललेली स्पर्धात्मक ('मुक्त'?) अर्थव्यवस्था यशस्वी होण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या स्वार्थाला, लोभाला व महत्त्वाकांक्षेला भडकवावं लागतं, त्यात तेल ओतावं लागतं. स्वार्थ व लोभमूलक प्रेरणेतून ‘प्रगती' साठी जिवापाड धावतांना जो मानसिक ताण निर्माण होतो, तो हृदयरोग निर्माण करतो. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमधे स्पर्धेचे जीवन जगणा-यांना तर हे लागू पडतंच; पण गडचिरोलीच्या जंगलात जाऊन आरोग्याचं काम करणारा 'समाजसेवक' देखील यातून वाचू शकला नव्हता.
              मी मोठा किंवा यशस्वी होणं म्हणजे मी इतरांपेक्षा कसा वेगळा, विशेष किंवा अधिक संपन्न हे सिद्ध करणं, इतरांसारखं, इतरांपैकी एक होणं म्हणजे साधारण होणं, असाधारण होण्यासाठी मला वेगळे बनावं लागतं. इतरांसोबतच्या माझ्या साधम्र्याऐवजी वेगळेपणावर भर द्यावा लागतो. यातूनच माझं एकलेपण निर्माण होतं, वाढतं. इतरांमधे व माझ्यामधे वेगळेपणाची पक्की भिंत तयार होते व ती भिंत बांधणारा मी स्वत:च त्या भिंतीच्या आत एकटा कैदी बनतो. कुणापासूनही असलं तरी एकटेपण घातक ठरतं. हृदयाला मारक ठरतं. अचानक माझ्या रोगाचं कारण मला लख्ख दिसायला लागलं!
              अनेक वर्षांपूर्वी केव्हातरी, न कळत, मी माझं नैसर्गिक जीवन व प्रसन्न मन या आधुनिक संस्कृतीच्या हवाली केलं. त्यातून प्रथम शरीराचा उपयोग थांबला व त्याच्याकडे दुर्लक्ष सुरू झालं. मग अधिक काम व यश प्राप्तीच्या मागे लागून मनाची सहज अवस्था सुटली. बुद्धी व विचारांच्या वाळवंटात भावनिक अनुभव पारखा झाला. प्रसन्नता गेली. पुढे मनामधे 'मी व माझं' वाढत गेलं. त्यांचच कुंपण स्वत:भोवती निर्माण झालं व विश्वाशी असलेली एकरूपता तुटली आणि आश्चर्य म्हणजे विश्वस्वरूपाशी नाळ तुटल्यावर स्वत:शी असलेला संपर्कही सुटला. माझं स्वत:शीच नातं तुटलं होतं. माझं घर हरवलं होतं. माझ्या एकसंध निरोगी जीवनाचे तुकडे तुकडे पडले होते.

46.

प्रस्तुत उता-याची मध्यवर्ती कल्पना कोणती ?

47.

व्यक्तीच्या एकटेपणाचे मूळ कोणत्या गोष्टीत आहे ?

48.

माणसाला 'मी' व 'माझं' यांचा जप का करावासा वाटतो? 

(a) स्पर्धेच्या तणावामुळे 

(b) स्वत:शी स्पर्धा करावी लागल्यामुळे 

(c) 'मी' केंद्री व स्पर्धेच्या आधुनिक जीवनव्यवहारात टिकून राहण्यासाठी 

(d) हृदयरोग टाळण्यासाठी 

पर्यायी उत्तरे :

49.

प्रस्तुत उतत्यास कोणते शीर्षक समर्पक वाटते ?

50.

लेखकाच्या मते हृदयरोग निर्माण होतो कारण :   

(a) 'स्व' व विश्वाशी असलेली एकरूपता तुटल्यामुळे.   

(b) विकसित देशांकडून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे.   

(c) स्वार्थी व लोभी मनोभावनेतून प्रगतीसाठी अतिरिक्त धडपड केल्यामुळे आलेले मानसिक ताण 

(d) जीवनात वेगळा व यशस्वी झाल्यामुळे. 

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ - मराठी व इंग्रजी Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.